Home संगमनेर संगमनेर धनगंगा पतसंस्था अपहार, अध्यक्षासह व्यवस्थापकाला १० वर्ष शिक्षा

संगमनेर धनगंगा पतसंस्था अपहार, अध्यक्षासह व्यवस्थापकाला १० वर्ष शिक्षा

Sangamner Dhanganga Patsanstha Aphar 

Sangamner | संगमनेर: घुलेवाडी येथील धनगंगा स्वयंसहायता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत झालेल्या ३ कोटी ९१ लाख ६१ हजार २५४ रुपयांच्या अपहारप्रकरणी न्यायालयाने संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष रंगनाथ काशिनाथ काशीद व व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे यांच्यासह १३ संचालकांना दोषी ठरविले आहे. काशीद व कवडे यांना प्रत्येकी १० वर्ष तर १३ संचालकांना प्रत्येकी २ वर्ष कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

घुलेवाडीतील धनगंगा पतसंस्थेत सचिन बजरंग कवडे हा २००६ पासून व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. त्याने ३१ मार्च २०१७ अखेर ३ कोटी ९१ लाख ६१ हजार २५४ रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षक अजय राउत यांनी केलेल्या लेखा परीक्षणातून ही बाब समोर आली. त्यानंतर त्यांनी याबाबत १७ ऑक्टोबर २०१७ रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संस्थेतील पाच कर्मचाऱ्यांसह २० जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

शहर पोलिसांनी त्यातील मुख्य सूत्रधार संस्थेचा तत्कालीन व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याच्यासह संचालक मंडळातील तत्कालीन अध्यक्ष रंगनाथ काशिनाथ काशीद, उपाध्यक्ष किरण रामदास जाधव, शांताराम मुक्ताजी राउत, सदस्य आनंदा लहानू पानसरे, विक्रम बाजीराव गुंजाळ, प्रवीण छबू भावसार, राजेंद्र मल्लू गायकवाड, मच्छिंद्र कारभारी ढमाले, भिकाराम गोपीनाथ राउत, अण्णासाहेब गंगाधर नवले, बाळासाहेब धर्माजी ढमाले, अशोक लहानू पानसरे, बाबासाहेब नाना राउत व अलका अशोक काशीद यांना अटक केली. व्यवस्थापक कवडे यांना वगळता इतर आरोपींची जामिनावर सुटका झाली होती.

संगमनेर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीसमोर झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाचे वकील बी. जी. कोल्हे यांनी युक्तिवाद करीत अनेक पुरावे सादर केले. ते गाह्य धरून वव्यवस्थापक कवडे व अध्यक्ष काशीद यांना १० वर्ष कारावास व उर्वरित १३ संचालकांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

Web Title: Sangamner Dhanganga Patsanstha Aphar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here