Home नागपूर Accident | तवेरागाडी ट्रक वर जाऊन आदळल्याने भीषण अपघात, सात जण ठार

Accident | तवेरागाडी ट्रक वर जाऊन आदळल्याने भीषण अपघात, सात जण ठार

seven died and one injured in nagpur road accident

नागपूर | Nagpur: नागपूर उमरेड मार्गावर विहीरगाव जवळील अड्याली फाट्याजवळ तवेरागाडी ट्रक वर जाऊन आदळल्याने भीषण अपघात (Accident)  झाला आहे. भरधाव तवेरा गाडी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकवर आदळल्याने अपघात झाला. रात्री १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.  

ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेरागाडी ट्रक वर जाऊन आदळली. ही धडक एवढी भीषण होती की अपघातामध्ये तवेरा कार चक्काचूर झाली आहे. सागर शेंडे, मेघा आशिष, देविदास गेडाम, नरेश डोंगरे अशी मृतांची नावे असून उर्वरितांची नावे समजू शकली नाही.

हा अपघात इतका भीषण होता की अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघातात एक मुलगी बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

घटनेची माहिती मिळताच हुडके‌श्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान या घटनेनंतर उमरेड मार्गावर काही काळासाठी वाहतूक ठप्प होती. उमरेड पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच मयत व जखमीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: seven died and one injured in nagpur road accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here