Home संगमनेर संगमनेर शहरातील डॉक्टरची ४० लाखांची फसवणूक

संगमनेर शहरातील डॉक्टरची ४० लाखांची फसवणूक

Sangamner Doctor's 40 lac Fraud

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील एका नामांकित डॉक्टरची जागा खरेदीतून ४० लाख रुपयाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात फसवणूक व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सणासुदीच्या दिवसांत खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शहरातील नवीन नगर रस्त्यावर गंगागिरी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ.योगेश बाळकृष्ण गेठे यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  या फिर्यादीनुसार डॉ.गेठे यांना फेब्रुवारी 2016 रोजी गुंजाळवाडी शिवारात गट क्रमांक 45 मधील दहा गुंठे जागा दाखविण्यात आली होती. सदर जागा त्यांना पसंद पडल्याने त्यांनी 24 फेब्रुवारी 2016 पासून रोजी व्यवहारातील भाग म्हणून 20 लाखांचा पहिला व त्यानंतर काही दिवसानंतर दुसरा हप्ता असे एकूण चाळीस लाख रुपये चेकद्वारे अदा करण्यात आले.

ही रक्कम अदा केल्यानंतरही जागा मालक प्रशांत प्रकाश झावरे, वनिता प्रशांत झावरे, प्रवीण प्रकाश झावरे, प्रकाश कोंडाजी झावरे व शारदा प्रकाश झावरे सर्व रा.घोडेकर मळा ता. संगमनेर यांनी ठरविल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण न करता फिर्यादीला ना जमीनीची कोणतीही कागदपत्रे दिली नाही, खरेदी खत करून दिले नाही. त्यामुळे डॉक्टरने आपण दिलेली रक्कम मागे देण्यास मागणी केली.

आरोपी झावरे कुटुंब फिर्यादी डॉ.गेठे यांचे पैसे देण्यास तयार होत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Sangamner Doctor’s 40 lac Fraud


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here