Home श्रीगोंदा सेक्स रॅकेटमधील आणखी एका महिला पुरविणारा दलाल अटकेत

सेक्स रॅकेटमधील आणखी एका महिला पुरविणारा दलाल अटकेत

Shrigonda woman supply broker arrested in sex racket

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यामध्ये एक महिला व एक  दलाल यांना अटक करण्यात आली होती.

याप्रकरणातील श्रीगोंद्यातील देवकर या दलालाकडे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सखोल चौकशी केली असता त्याने दौंड येथील प्रकाश धनाजी बांगळे हा दलाल वेश्या व्यावसायासाठी मुली व महिला पुरवीत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.

बांगळे याला न्यायालयासमोर हजर केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. बांगळे हा दलाल दौंड येथील सेक्स रॅकेटमधील मोठा दलाल आहे. तो पुणे येथील मुली यांना वेश्याव्यवसायसाठी दौंडमध्ये सेक्स रॅकेट चालवत होता. मात्र दौंड पोलिसांच्या हातून वाचून त्याला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. तसेच श्रीगोंदा येथील दलाल देवकर व महिला यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Shrigonda woman supply broker arrested in sex racket

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here