Home क्राईम Crime: संगमनेर एका शैक्षणिक संस्थेमध्ये ७५ लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

Crime: संगमनेर एका शैक्षणिक संस्थेमध्ये ७५ लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

Sangamner embezzles Rs 75 lakh from an educational institution Crime Filed

Sangamner Crime | संगमनेर: अलाईड एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था स्थापन करुन त्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या नॅशनल स्कूल नावाच्या शाळेच्या मिळकतीवर धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेता एका खासगी फायनान्स कंपनीकडून सुमारे ७५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याची फिर्याद संस्थेचा विश्वस्त व अध्यक्ष रईस अहमद शेख यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार एका मयतासह सहा जणांवर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्ट ३६ सह सुमारे अकरा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत येथील शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलाईड एज्यूकेशन सोसायटी, समनापूर या नावाच्या संस्थेची स्थापना करुन २००२ मध्ये नॅशनल स्कूल या शाळेची उभारणी करण्यात आली होती. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीच्या पैशातून आरोपींपैकी जाकीर करीम तांबोळी यांच्या नावावर खरेदी केलेल्या मिळकतीवर शाळेची इमारत उभी आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाचा वादही तीन वर्षापासून सुरु असून न्यायालयात प्रलंबित आहे. संस्थेचा पूर्वाश्रमीचा अध्यक्ष करीम ईस्माईल तांबोळी मयत असून जुलै २०१८ नंतर पदावर नसताना नात्यातील विश्वस्त व मुख्याध्यापक प्रकाश जालिंदर वर्पे यांनी जानेवारी २०१९ नंतर संस्थेचे नाव वापरुन खोटी कागदपत्रे तयार करुन खोटे कारण देवून कर्ज मागणी केली. त्या अनुषंगाने संस्थेच्या लेटरहेडवर  पदाधिकारी असल्याचे भासवुन स्वतःच्या व कुटूंबाच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने खोटा ठराव करुन थेरुमेणी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, बेंगलोर यांचेकडुन ७५ लाख ३१ हजार ३५० रुपयांचे  कर्ज घेवून त्याचा अपहार केला. यासाठी शालेय प्रशासन अथवा धर्मादाय आयुक्त कार्यालयाची “परवानगी घेण्यात आली नाही. तसेच संबंधित ठरावही संस्थेच्या प्रोसिडींग बुकवर नाही व ही रक्कमही शाळेच्या खात्यात जमा झालेली नाही व विकासासाठी वापरण्यात आली नाही. या कर्जाचे हप्ते मात्र शाळेच्या खात्यातून दरमहा १ लाख १६ हजार ७६१ रुपये याप्रमाणे वजा होत असून आजपर्यंत २५ लाख पेक्षा जास्त रक्कम कर्जापोटी संस्थेकडून भरण्यात आली आहे. ही बाब संबंधित फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी फिर्यादी रईस अहमद शेख यांनी न्यायालयात दाद मागितली. व त्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसनी करीम ईस्माईल तांबोळी (मयत), जाकीर करीम तांबोळी, वसिम करीम तांबोळी, नाजीम करीम तांबोळी (चौघे रा. लोणी, ता. राहाता), नजीर इस्माईल तांबोळी (रा. वडगाव पान, ता. संगमनेर ) व प्रकाश जालिंदर वर्षे ( रा. कनोली, ता. संगमनेर ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Sangamner embezzles Rs 75 lakh from an educational institution Crime Filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here