Home Accident News संगमनेर: विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

संगमनेर: विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Sangamner Farmer dies of electric shock

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अमोल दत्तात्रय शेळके असे असे या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शेळकेवाडी येथील शेतकरी अमोल शेळके हे रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान विहिरीवरील विद्यत पंप चालू करीत असताना त्यांना विजेचा शॉक लागला. त्यामुळे ते बेशुद्ध झाल्याने त्यांना उपचारासाठी घारगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह शवविचेदन करण्यासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Sangamner Farmer dies of electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here