Home अकोले भंडारदरा धरणात मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटली या तालुक्यातील तो तरुण

भंडारदरा धरणात मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटली या तालुक्यातील तो तरुण

youth who died in Bhandardara dam was identified

भंडारदरा | Bhandardara Dam: शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भंडारदरा धरणात एक जण बुडाल्याची माहिती राजूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पोलीस पथक हजर होऊन शोध घेण्याचा प्रयत्न सुरु झाला. शनिवारी रात्री आठ वाजता तरुणाचा मृतदेह स्पिल्वे गेट जवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला.

त्या तरुणाची रविवारी रात्री उशिराने ओळख पटली आहे. बुडून मृत्यू झालेला तो तरुण राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील सागर विजय थोरात वय २० असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी एक अनोळखी तरुण बुडून मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री उशिरा आठ वाजता त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यांनतर राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. रविवारी रात्री उशिराने त्याच्या नातेवाईकांनी राजूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधत मयत तरुण सागर विजय थोरात असल्याचे सांगितले.

Web Title: youth who died in Bhandardara dam was identified

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here