संगमनेर: बिबट्याने केला दोन तरुणांचा पाठलाग
संगमनेर: बिबट्याने केला दोन तरुणांचा पाठलाग
सारोळे पठार: संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार शिवारात रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास शेतातील पंप सुरु करून परतणाऱ्या तरुणानाचा बिबट्याने पाठलाग केला. तरुणांनी प्रसंगावधान राखत पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
रविवारी रात्री साडेदहाच्या वेळेला शुभम पोखरकर व सुनील मधे हे तरुण शेतातील विद्युतपंप सुरु करुन परतत असताना त्यांना बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी काय गुरगुरते म्हणून बॅटरीचा प्रकाश टाकला. त्यात बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याच क्षण बिबट्याने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या तरुणांनी आरडाओरडा करीत पळ काढला. घाबरलेल्या अवस्थेत येऊन त्यांनी इतर लोकांना माहिती दिली. संगमनेर वन परिक्षेत्र कार्यालयाकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेली आहे. सारोळे पठार भागात बर्याच दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा