Home संगमनेर संगमनेर तालुक्यात खवले मांजर तस्करांची टोळी गजाआड

संगमनेर तालुक्यात खवले मांजर तस्करांची टोळी गजाआड

Sangamner gang of scaly cat smugglers

संगमनेर | Sangamner: खवले मांजरांची तस्करी करणाऱ्या टोळीला पुणे येथील वनविभागच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळ शिवारात पाठलाग करीत पकडली आहे.

यावेळी त्यांच्याकडून एक खवले मांजर, बोलेरो जीप, मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तिघे जण ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार झाले आहे, शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.  

पुणे येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक पवार, वन रक्षक मयूर बोठे यांना गुप्त खबर्यामार्फत माहिती मिळाली की, सातारा येथे दुर्मिळ खवले मांजराची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तस्करी यांना संशय आल्याने त्यांनी जागा बदलून पुणे या ठिकाणी विक्री करण्याचे ठरविले. मात्र त्यांना पुणे येथे विक्री करण्याचे ठरविल्याची माहिती समजली असल्याची तस्करांना संशय आल्याने विक्री स्थगित केली.

हे तस्कर पुणे नाशिक महामार्गाने संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ शिवारात गेल्याचे वनविभागाला समजले. पुणे येथील वन अधिकाई व कर्मचारी यांनी पाठलाग करीत घारगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहायाने तिघांना ताब्यात घेतले.   

Web Title: Sangamner gang of scaly cat smugglers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here