प्रेयसीनेच मारले प्रियकराला, शिर नसलेल्या मृतदेहाचा उलगडा
श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारातील टाकळी खून प्रकरणाचा अखेर पोलिसांनी तपास लावत पाच आरोपींना अटक केली आहे.
प्रेयसीने सहकाऱ्यांच्या मदतीनेच प्रियकराचा खून केल्याचे उघड झाले आहे. रमेश सदाशिव जाधव वय ५९ रा. आंबेगाव जि. पुणे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या खुनाचा मुख्य सूत्रधार सुषमा गवाले ही आंबेगाव परिसरात भंगाराचा व्यवसाय करत असे. मयत रामेश जाधव व तिचे संबध होते. सुषमा ही लॉकडाऊन काळात बारामतीला तिच्या भावाकडे राहण्यासाठी गेली होती. या दरम्यान सुषमा व राजेश गायकवाड यांच्यात मैत्री झाली. रमेश हाही सुषमा हिला भेटण्यासाठी बारामतीला जात होता. तो सुषमाकडे शरीर सुखाची मागणी करत होता. रमेश जाधव याच्या त्रासाला कंटाळून अखेर सुषमा हिने तेजस भोसले, अमोल कांबळे, प्रशांत साबळे व राजेश गायकवाड यांच्या मदतीने खुनाचा कट रचला. रमेश याला जमीन दाखविण्याच्या बहाण्याने ३१ जानेवारी रोजी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील निर्जनस्थळी आणले. यावेळी रात्र झाली होती. यावेळी रमेशची सत्तूरने हत्या करण्यात आली. त्यानंतर गळा कापून शरीर व धड एका बाजूला करण्यात आले. शरीर एकीकडे व धड एकीकडे पुरले. हे प्रेत कुत्र्यांनी उकरल्याने हा खून उघडकीस आला. आरोपींनी दोन दिवसानंतर शिर खड्ड्यातून काढून सिद्धटेक शिवारात नेऊन जाळले. अशी माहिती पोलिसांनी दिली.
रवींद्र गवाले, तेजस भोसले, अमोल कांबळे, प्रशांत साबळे व राजेश गायकवाड, सुषमा गवाले यांना अटक करण्यात आली आहे.
मयत रमेश जाधव यांच्या शर्टवर शुभम टेलर्स पुणे ४६ असा लोगो होता. या लोगोवरून पोलिसांनी पुणे येथील सर्व पोलीस स्टेशनला माहिती दिली होती. नातेवाइकांनी शर्टवरून प्रेत ओळखले. पोलीस निरीक्षक ढिकले यांच्या पथकाने तपास करत या घटनेचा उलगडा केला.
Web Title: Shrigonda lover killed the lover