Home संगमनेर संगमनेर तालुक्यात दुकानास आग, दहा ते बारा लाखांचे नुकसान

संगमनेर तालुक्यात दुकानास आग, दहा ते बारा लाखांचे नुकसान

the shop burned in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे कारखाना रोड येथे असणाऱ्या एका भंगाराच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या अचानक लागलेल्या आगीने दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील समनापूर गावातील घुलेवाडी रस्त्यावर कुरण येथील अयाज अब्दुल शेख यांचे सहयाद्री ट्रेडर्स असे भंगाराचे दुकान आहे. या भंगाराच्या दुकानाला मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागून दुकानातील प्लास्टिक पाईप वायरी, रद्दी व इतर साहित्य याने अचानक पेट घेतल्यामुळे आगीचे मोठे लोळ बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिक घाबरून गेले. या गोदामातील स्कूल बस सुद्धा जळून गेल्या. या दुकानाशेजारील गाड्यांचे टायर सुद्धा जळून गेले.

या दुकानाला आग लागल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दुकानाचे मालक आयाज शेख यांना दिली. तर काही अग्निशमन दलाल कळवीत पाचारण करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने ही आग विझविली.   

Web Title: the shop burned in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here