Home क्राईम India vs England 2nd Test: रोहित शर्माचे ४८१ दिवसानंतर खणखणीत शतक

India vs England 2nd Test: रोहित शर्माचे ४८१ दिवसानंतर खणखणीत शतक

ndia vs England 2nd Test Rohit Sharma Hundreds

India vs England 2nd Test: आज रोहित शर्माला सूर गवसलेला आहे. चेन्नईट सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत रोहितने खणखणीत शतक झळकावले आहे. रोहितने १३३ चेंडूत शतक पूर्ण केल्याने डावाला आकार दिला आहे.

त्याचे कसोटी क्रिकेटमधील सातवे शतक आहे. तर इंग्लंडविरुद्ध पहिले शतक आहे. त्याने ४८१ दिवसानंतर कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. रोहितला मागील आठ सामन्यात एकही शतक करता आले नाही. त्याने ऑक्टोबर २०१९ मध्ये रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१२ धावा केल्या होत्या.

रोहितने २०१३ साली कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. वेस्ट इंडीज विरुद्ध लढत असतना त्याने पदार्पण केले होते. यावेळी त्याने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात शतक केले होते.

दरम्यान आजचा पहिल्या इनिंगमध्ये भारताचा स्कोअर १८७ रन झालेले आहेत. तीन विकेटस गेल्या आहेत तर ५२ ओव्हर झाल्या आहेत.

यामध्ये रोहित शर्मा नॉट आउट १३१ रन्स १७५, शुभम गिल याला भोपळाही फोडता आला नाही. चेताश्वर पुजारा २१ रन्स करून माघारी परतला आहे. विराट कोहली सुद्धा एकही रण न काढता माघारी परतला आहे.  अजिंक्य राहणे ३५ रन्सवर खेळत आहे.  

Web Title: India vs England 2nd Test Rohit Sharma Hundreds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here