Home संगमनेर संगमनेर: चंदनापुरी घाटात झालेल्या अपघातात पाच जखमी

संगमनेर: चंदनापुरी घाटात झालेल्या अपघातात पाच जखमी

संगमनेर: चंदनापुरी घाटात झालेल्या अपघातात पाच जखमी

घारगाव: कंटेनरने जीपला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात जीप मधील पाच प्रवासी जखमी झाले. हि घटना नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.  

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दहा जण जीप मधून (एम.एच.०६ सी.७०७२) नाशिककडे निघाले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नाशिककडे भरधाव वेगाने निघालेला कंटेनर (क्र. एच. आर.५५ यु. ७२९५) चंदनापुरी घाटात आला असता ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर जीपला पाठीमागून जाऊन धडकला. या धडकेने जीप रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर जाऊन उलटली.  या अपघातात जीप चालक विकास अर्जुन मधे, संगीत संजू आधान, सोनाबाई गंगाराम जाधव, संजू लक्षमण आधान (सर्व जुन्नर) हे पाच जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच डोळसणे येथील महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक दादासाहेब मोसे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ संगमनेरातील रुग्णालयात दाखल केले


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here