Home संगमनेर संगमनेरात अनोखे आंदोलन:  गाढवाला दुध पाजून सरकारचा निषेध

संगमनेरात अनोखे आंदोलन:  गाढवाला दुध पाजून सरकारचा निषेध

Sangamner Government protests against donkey milk

संगमनेर | Sangamner: दुध खरेदीचे दर सातत्याने कमी केले जात असल्याने दुध उत्पादक शेतकरी उद्वस्त झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांती दिनी सोमवारी संगमनेर तालुक्यातील मंगळापूर गावात अनोखे आंदोलन केले आहे. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत गाढवाला दुध पाजले.

दुध व्यवसायातील अनिश्चितता काही प्रमाणात कमी व्हावी व दुध उत्पादकांना दिलासा मिळावा यासाठी दुध उत्पादक आपल्या मागण्यासाठी कायम संघर्ष करीत आहे.

दुधाला एफआरपीचे संरक्षण मिळावे यासाठी निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट नोट बनविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही प्रकिया जलद पूर्ण करावी यासाठी ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे.

गाईच्या दुधाला प्रती लिटर ३५ रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रती लिटर ६० रुपये भाव द्यावा. लॉकडाऊन काळात दुध कंपन्यांनी २० रुपयाने दुध खरेदी केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी लॉकडाऊन काळात दुध घातलेल्या शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान मिळावे अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. निवेदन मंडलाधिकारी बापूसाहेब ससे यांनी स्वीकारले.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

दीपक वाळे, रमेश पवार, सोमनाथ भोकनळ, अशोक वाळे, भानुदास गोरे, शिवाजी वाळे, रावसाहेब वाळे, भाऊसाहेब वाळे, गेनू पवार, शांताराम पवार, अण्णासाहेब वाळके, संजय सावंत, रामदास वाळे, आदी दुध उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Sangamner Government protests against donkey milk

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here