Home अहमदनगर खळबळजनक घटना: वाहत्या पाण्यात आढळले माय लेकाचा मृतदेह

खळबळजनक घटना: वाहत्या पाण्यात आढळले माय लेकाचा मृतदेह

Ahmednagar news body was found in the flowing water

शेवगाव | Ahmednagar News: तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नदीच्या वाहत्या पाण्यात एक महिला व मुलाचा मृतदेह सोमवारी आढळून आला आहे, ही हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. पोलिसांनी मात्र अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पती ही घटना घडल्यानंतर पसार झाला.

ज्योती अंबादास सोनवणे वय २८ व दीपक अंबादास सोनवणे वय ८ अशी मयातांची नावे आहेत.

ज्योती व दीपक सोनवणे, पती अंबादास सोनवणे  व अन्य एक महिला असे चार जण घरामधून रविवारी दुपारी १ वाजता बाहेर गेले होते. रात्री अंबादास सोनवणे हे एकटेच घरी आले. त्याने मुलगी प्रियांका हिच्याकडे तुझी आई व दीपक घरी आले नाही का असे विचारले. ती नाही म्हंटल्यावर प्रियांका हिला घेऊन अंबादास सोनवणे हे बोधेगाव पोलीस चौकीत जावून ज्योती व दीपक रविवारी दुपारपासून बेपत्ता झाले असल्याची माहिती दिली.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

मुलीला घरी सोडून ते काल आईला व मुलाला पाहतो असे सांगून घरामधून निघून गेले. ते पुन्हा घरी आले नाहीत. गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली मात्र माय लेक कुठे आढळून आले नाहीत. रात्री परिसरात पाउस झाल्याने सकाळी शेवगाव गेवराई रस्त्यावर ठाकूर पिंपळगाव नदीला पाणी आले त्यामध्ये दोन मृतदेह वाहत येऊन पुलंच्या नळ्यांमध्ये अडकलेले आढळून आल्याने प्रकार समोर आला आहे.

Web Title: Ahmednagar news body was found in the flowing water

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here