संगमनेर: चोरटया महिला असल्याच्या संशयाने बस पोलीस ठाण्यात
चोरटया महिला असल्याच्या संशयाने बस पोलीस ठाण्यात
घारगाव: इगतपुरीहुन पुणे येथे जाणाऱ्या एसटी बसमध्ये गोंधळ केल्याने , प्रवाशांना त्या महिलांविषयी संशय आल्याने संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे उतरण्याच्या गडबडीत असलेल्या सहा महिलांना चोरीच्या संशयावरुन प्रवाशांच्या सहाय्याने घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
इगतपुरी आगरातिल वाहक नंदकुमार चव्हाण त्यांच्या ताब्यातील (एमएच ४० बाय ५६५० ) बसने इगतपुरी पुण्याकडे जात असताना संगमनेर बायपास येथे काही महिला एसटीत चढल्या. बस घारगाव परिसरात उतराला आल्यावर त्यांनी केलेल्या गडबडीमुळे शशिकला राजेंद्र दिक्षीत (रा. सांगवी (पुणे) यांची पर्स व मोबाईल गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. संबंधित महिलांना अडवुन गाडीत शोध घेतला असता एका बाकडयाच्या खाली त्या महिलेची पर्स व मोबाईल मिळुन आला. एसटी वाहकाला चोरीचा संशय आल्याने बस घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आली. मात्र याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे घारगाव पोलिसांनी चॅप्टरची कारवाई करुन त्यांना तहसीलदारांसमोर हजर केले. त्यानंतर त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.