Home क्राईम संगमनेर: पोलीस कर्मचार्‍याची चार चाकी गाडी जळून खाक, गाडीला आग लागली की...

संगमनेर: पोलीस कर्मचार्‍याची चार चाकी गाडी जळून खाक, गाडीला आग लागली की आग लावली……

Sangamner incident where the private car of a policeman got burnt. When the car caught fire, the car was deliberately set on fire: संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याची खाजगी गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. गाडीला आग लागली की गाडीला जाणीवपूर्वक आग लावली याबाबत पोलीस चौकशी करीत आहे.

Sangamner incident where the private car of a policeman got burnt

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याची खाजगी गाडी जळून खाक (Burnt) झाल्याची घटना घडली आहे. गाडीला आग (Fire) लागली की गाडीला जाणीवपूर्वक आग लावली याबाबत पोलीस चौकशी करीत आहे. शेताच्या बांधावरील गवत  पेटवल्यानंतर लागलेल्या आगीमध्ये एका पोलीस कर्मचार्‍याची खाजगी गाडी जळून खाक झाली. तालुक्यातील घारगाव परिसरात शनिवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  घारगाव परिसरात राहणार्‍या जगदीश नानाभाऊ आहेर याने काल 1.30 वाजेच्या सुमारास त्याच्या मालकीच्या शेताच्या बांधावर उगलेले व वाळलेले गवत पेटवून दिले. कोणतीही खबरदारी न घेता तो तेथून निघून गेला. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्र स्वरूप धारण केले.

या ठिकाणी कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण यांची मारुती सुझकी कंपनीची वॅगनर गाडी (क्रमांक एम एच 14 बी आर 727) ही गाडी उभी होती. आगीच्या ज्वालामुळे प्लास्टीक शेडनेटने पेट घेतला. यामुळे चव्हाण यांच्या गाडीला आग लागली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. याबाबत

पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी जगदिश नानाभाऊ आहेर रा. घारगाव, ता. संगमनेर याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 66/2023 भारतीय दंड संहिता कलम 285 प्रमाणे दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक आर. ए. लांघे पुढील तपास करत आहे.

Web Title: Sangamner incident where the private car of a policeman got burnt

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here