Home महाराष्ट्र राजीनाम्यावर बाळासाहेब थोरातांचे माध्यमांशी पहिल्यांदाच महत्त्वाचे भाष्य, म्हणाले….

राजीनाम्यावर बाळासाहेब थोरातांचे माध्यमांशी पहिल्यांदाच महत्त्वाचे भाष्य, म्हणाले….

Balasaheb Thorat’s resignation made an important comment on his displeasure. काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर थोरात यांनी माध्यमांशी संवाद.

Balasaheb Thorat's resignation made an important comment on his displeasure

Balasaheb Thorat resign: विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले. यानंतर  काँग्रेसमधील अंतर्गत कलह बाहेर आल्याचे म्हटले जात होते. आता बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या नाराजीवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलले

मागील काही दिवसांपासून मी माध्यमांसमोर आलेलो नाही. माझा राजीनामा हा काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. माध्यमांनी त्याला खूप मोठं केलं. आज माझी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी मला काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनाला यावे, असा आग्रह केला आहे. मी या अधिवेशनाला जाणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर अध्यक्ष मल्लिकार्जुव खरगे याच्यासोबत बसून चर्चा करावी, असे मत एच के पाटील यांचे आहे. त्यामुळे चर्चा होईल. काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा होईल. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत,” असेही बाळासाहेब थोरात म्हंटले आहे.

माध्यमांनी विचारले असता, तुमची नाराजी दूर झाली का? या प्रश्नाचे बाळासाहेब थोरात यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात बाळासाहेब थोरात काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Balasaheb Thorat’s resignation made an important comment on his displeasure

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here