Home संगमनेर बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचविणाऱ्या आईचा मंत्री थोरातांकडून गौरव

बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचविणाऱ्या आईचा मंत्री थोरातांकडून गौरव

Sangamner Kavita Khatal Gaurav

संगमनेर | Sangamner: शेतात घास कापत असताना चिमुकल्याव हल्ला करत त्याला ओढत नेणाऱ्या बिबट्याच्या तावडीतून आपल्या मुलाला वाचविणाऱ्या कविता खताळ यांचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गौरव केला आहे.

धांदरफळ खुर्द येथे मंत्री थोरात यांनी खताळ परिवाराला भेट दिली. यावेळी कविता खताळ यांचा गौरव केला.

आठ दिवसांपूर्वी माणकेश्वर मळा येथील चार वर्षाचा मुलगा शिव हा आई बरोबर शेतामध्ये होता. कविता या कापत असताना मागून दबा धरून असलेल्या बिबट्याने लहान शिव यास पकडले. जवळपास २०० फुट ओढत नेले. अश्या कठीण परिस्थितीत आई कविता हिने जीवाची बाजी लावत आपल्या मुलाला बिबट्याच्या तावडीतून सुखरूप सोडवले. संगमनेर येथील खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत शिवला ३७ टक्के टाके पडले. खताळ यांची कहाणी एक हिरकणीच्या कहाणीप्रमाणे आहे. सध्याच्या महिलांसाठी प्रेरणादायी आहे. आई मुलासाठी बाजी लावू शकते हे उदाहरण कविता यांनी दाखवून दिले आहे. अशा शब्दात मंत्री थोरात यांनी कविता यांचे कौतुक केले.  

Web Title: Sangamner Kavita Khatal Gaurav

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here