Home महाराष्ट्र Delta Plus: राज्यात डेल्टा प्लसचे आणखी १० रुग्ण, या जिल्ह्यात सर्वाधिक

Delta Plus: राज्यात डेल्टा प्लसचे आणखी १० रुग्ण, या जिल्ह्यात सर्वाधिक

Delta Plus another 10 patient in Maharashtra 

Delta Plus: अधिक संसर्ग प्रादुर्भाव मानल्या जाणाऱ्या कोरोनाचे डेल्टा प्लसचे राज्यात आणखी १० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे डेल्टा प्लसचे बाधित संख्या ७६ इतकी झाली आहे. नवीन १० रुग्णांत ६ जण कोल्हापूरमधील तर रत्नागिरी ३, आणि सिंधुदुर्ग मधील एका जणाचा समावेश आहे. हे सर्व जण कोरोनातून बरे झालेले असल्याने चिंतेचे कारण नसल्याचे सरकारने म्हंटले आहे.

आत्तापर्यंत ७६ जणांपैकी ७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मयत मध्ये दोन महिला तर ३ पुरुषांचा समावेश आहे.  जनुकीय क्रमनिर्ध्रानाच्या आधारे कोरोनाच्या विविध स्वरूपाची ओळख पटविण्याचे काम केले जात आहे. या तपासणीतून राज्यात ८० टक्क्याहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टाचे स्वरूप आढळत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Delta Plus another 10 patient in Maharashtra 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here