Home क्राईम संगमनेर कॉलेज परिसरातून तरुणीचे अपहरण करत सामूहिक बलात्कार, अंगावर दिले सिगारेटचे चटके

संगमनेर कॉलेज परिसरातून तरुणीचे अपहरण करत सामूहिक बलात्कार, अंगावर दिले सिगारेटचे चटके

Sangamner Kidnapping of a young girl and gang rape

संगमनेर | Rape Case:  संगमनेर शहरातील एका १८ वर्षीय विद्यार्थीनीवर संगमनेर काॅलेज परिसरातुन अपहरण करत चार नराधमाकडुन सलग तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर अशी सलग तीन दिवस संगमनेर काॅलेज, सिन्नर व नाशिक या तीन ठिकाणी नेऊन आरोपी प्रविण अरुण लगड, संकेत भगवान राणे, दर्शन शिवाजी हिरे, राहुल कैलास वाघमारे हे चारही आत्याचार करणारे आरोपी सिन्नर तालुक्यातील आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत तरुणी संगमनेर काॅलेज समोरुन जात असताना नराधमांनी स्विफ्ट कार मध्ये बळजबरीने अपहरण करुन सिन्नर येथील हाॅटेल सदानंद या ठिकाणी नेऊन आरोपी प्रविण याने मारहाण करून आमली द्रव्यांचे शीतपेय पाजून पिडीतेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केली हे नराधम ऐवढेच करुन राहीले नाही तर शरिरावर पेटत्या सिगारेटचे चटके सुद्धा दिले. नग्नावस्थेत मोबाईल मध्ये फोटो व व्हिडिओ तयार करण्यात आले. या व्हिडिओ च्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे शडयंत्र सुरू झाले.

पुन्हा १ डिसेंबर रोजी या नराधमांनी नाशिक येथे हाॅटेल पंचवटी येथे नेऊन पिडीतेला जिवे मारण्याच्या धमक्या देत फोटो व व्हिडिओ प्रसारित करु अशा धमक्या देत लग्न करण्याची मागणी केली व बळजबरीने कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या.

पिडीतेस पुन्हा नाशिक हुन सिन्नर येथील हाॅटेल साई सावली लाॅजिंग मध्ये नेऊन आरोपी प्रविण याने जिवे मारण्याची धमकी देत संबंध करतानाचे चित्रिकरण करण्यात आले.

२ डिसेंबर रोजी पिडीतेस जबरदस्तीने सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये आणुन पोलीस ठाणे अंमलदार यांचे समोर ‘मी माझ्या मर्जीने घरुन निघून आले आहे,मला कोणीही जबरदस्तीने पळवुन आणले नाही’ असा जबाब जबरदस्तीने आरोपींनी पिडीतेस देण्यास ब्लॅकमेवलिंग करत पोलिसांसमोर लिहून देण्यास भाग पाडले.

सदर पिडित तरुणी नातेवाईक यांच्या सोबत घरी गेली असता झालेला सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला तरुणी अंत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असल्याने आई वडिलांनी सांत्वन करत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या चारही आरोपींवर महिला अत्याचार नुसार ठाणे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल धनवट यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. उपविभागीय पोलीस उपाधिक्षक राहुल मदने व शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पिडितेच्या कुंटबांची भेट घेतली आहे असुन अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहे.

Web Title: Sangamner Kidnapping of a young girl and gang rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here