Home संगमनेर संगमनेर : बिबटया थेट स्वयंपाक घरात

संगमनेर : बिबटया थेट स्वयंपाक घरात

संगमनेर : बिबटया थेट स्वयंपाक घरात

संगमनेर (प्रतिनिधी) : – जंगलामध्ये बिबटयांना खाण्यासाठी काही मिळत नसल्याने ते भक्ष्याच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. काल मांजरीचा पाठलाग करत बिबटया थेट स्वयंपाक घरात घुसला आणि घरांमधील लोकांचा थरकाप उडाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथे नुकतीच घडली आहे.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

काही दिवसांपासुन घारगाव व आंबीखालसा परिसरात बिबटयाने धुमाकुळ घातला आहे. पाच ते सहा दिवसांपुर्वीच बिबटया गावात आला होता. पण लोकांनी त्याला पिटाळले होते. पण त्यांनतर आंबी,  मळेगावात पठार रस्त्यालगत असणारे सुभाष आण्णसाहेब ढमढेरे यांच्या घराच्या पाठीमागे बाजरीचे पीक आहे. तीन दिवसांपुर्वी रात्री ८ च्या सुमारास घरातील महिला व लहान मुले शेजारच्या खोलीत होते. त्याच वेळी बाजरीतुन मांजर घराच्या दिशेने धावत आले. त्यापाठोपाठ बिबटयाही आला आणि मांजर व बिबटया थेट स्वयंपाकघरात घुसले, पण मांजर हुशार असल्याने ती वरच्या फळीवर बसली आणि स्वयंपाक घरातील भांडी खाली पडली.  भांडयाचा आवाज आल्याने शेजारी असलेल्या महिलेने दरवाज्यातुन डोकावुन पाहिले असता समोर बिबटया दिसला. त्यामुळे तिही घाबरुन गेली. तीने मुलांना कपाटाच्या आड लपवले.  फळीवर बसलेले मांजर खाली येईना म्हणुन बिबटया निघुन गेला.  त्यानंतर त्या महिलेच्या जिवात जीव आला;  पण मुलांनीही बिबटयाला पाहिले होते. त्यामुळे तेही घाबरुन गेले होते. त्या दिवशी रात्री मुलांनी जेवनसुध्दा केले नाही.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here