Home संगमनेर संगमनेरात कुंकवाचे पाणी

संगमनेरात कुंकवाचे पाणी

 संगमनेरात कुंकवाचे पाणी

संगमनेर शहरात मोकाट जनावर त्यातही कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने व नगरपालीकांकडुन काहीही उपाययोजना होत नसल्यानं आता येथील नागरीकांनी कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी मोठा रामबाण उपाय शोधुन काढला आहे. मोकाट कुत्रे  आपल्या घरासमोर दुकानांसमोर येऊ नये. कु नये, घाण करु नये म्हणुन संगमनेरात अनेकांच्या तंत्रज्ञानाच्या युगातही अंधश्रध्दा जोपासणारे अनेक जण असतात. सोशल मिडीयातुनही अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम मोठया प्रमाणावर केले जात आहे. कुकंवाचे पाणी ही आयडीयाची कल्पनाही तेथुनच आल्याचे समजते. मुळातच कुत्रा व इतर कोणत्याही प्राण्यांना रंग ओळखण्याची शक्ती निसर्गाने दिली नाही. त्यामुळे ते लाल पाण्याला घाबरण्याची मुळातच शक्यता नाही. लाल रंगाची जर त्यांना भिती वाटत असती तर कुत्रे लाल गाडया , लाल रंगाचे कपडे घालणाऱ्यांना चावली नसती. कुणाच्या तरी डोक्यातुन ही कुंकवाच्या पाण्याची सुपीक कल्पना आली. आणि त्याचे अनुकरण सर्व संगमनेरात होतांना दिसत आहे.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

अनेक दुकानांसमोर दोन, तीन कुंकवाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या त्याही चोरी जावु नये म्हणुन , दोरीने बांधलेल्या बाटल्या ठेवलेल्या दिसत आहे. अनेकांना नेमका हा काय प्रकार आहे हे सुध्दा माहित नाही. आम्ही जेंव्हा याबाबत चौकशी केली तेंव्हा याबाबतच उलगडा झाला. ही अफवा किंवा अंधश्रध्दा शहारात वाऱ्यासारखी पसरली असुन त्याचे अनुकरण करतांना अनेक जण दिसु लागले आहे. दरम्यान या प्रकारामुळे जर कुत्र्यांचा बंदोबस्त झाला तर नगरपालीकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा नोकऱ्या मात्र धोक्यात आहे असेच म्हणावे लागेल.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here