Home संगमनेर संगमनेर मार्केट यार्ड येथे गोडाऊनला भीषण आग, लाखोंचे नुकसान

संगमनेर मार्केट यार्ड येथे गोडाऊनला भीषण आग, लाखोंचे नुकसान

Sangamner Market Yard Godown Fire

संगमनेर: संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला मंगळवारी सायंकाळी ९ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आग विझविण्याचे काम सुरु आहे. गोदामातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

याबबत अधिक माहिती अशी की. संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस वखार महामंडळाचे गोदाम आहे या गोदामात धान्य व कापूस अशा वस्तू साठवून ठेवलेल्या असतात. मंगळवारी सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास या गोदामाला अचानक भीषण आग लागली. या आगीने जाळाचे मोठे लोटच बाहेर पडत होते. त्यामुळे एकच धावपळ उडाली. संगमनेर साखर कारखाना व नगरपालिका बंबास पाचारण करण्यात आले असून युद्ध पातळीवर आग विझविण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी शहरातील पदाधिकारी व बाजार समितीचे सदस्य उपस्थित असून भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.  

Web Title: Sangamner Market Yard Godown Fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here