Home संगमनेर संगमनेर: मुलाच्या निधनानंतर आईचाही मृत्यू, पंचक्रोशीत हळहळ

संगमनेर: मुलाच्या निधनानंतर आईचाही मृत्यू, पंचक्रोशीत हळहळ

 

Sangamner mother also died after the death of the child

आश्वी |Sangamner| Ashwi:  संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल बाबासाहेब हिरामण मुन्तोडे (वय 50) यांचे विषबाधा (Poisoning) झाल्याने शुक्रवार दि. 18 मार्च रोजी निधन झाले होते. त्यामुळे मुलाच्या अकाली निधनामुळे (Death) अस्वस्थ झालेल्या मातोश्री छबुबाई हिरामण मुन्तोडे (वय 67) यांना आपल्या मुलाचा विरह असह्य झाल्यामुळे त्यांनीही सोमवार दि. 21 मार्च म्हणजे अवघ्या तिसर्‍या दिवशी देह त्याग केल्यामुळे माय-लेकाच्या मृत्यूमळे पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या वरवंडी, हजारवाडी, मालुंजे या गावात सामाजिक दायित्वातून ते नेहमी मोफत टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत असत. अशा या बाबासाहेब मुन्तोडे यांना 15 मार्च रोजी शेतात विषबाधा झाली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना लोणी येथिल उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र शुक्रवारी सकाळी 10 वा. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आपल्या अंगा खाद्यावर खेळलेल्या आपल्या मुलाचे अकाली निधन झाल्यामुळे छबुबाई मुन्तोडे यांना मोठा मानसिक धक्का बसला. मुलाच्या विरहामुळे त्यांनी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले. सदैव मुलाच्या आठवणीने त्या अस्वस्थ होत असल्याने सोमवार दि. 21 मार्च म्हणजे अवघ्या तिसर्‍या दिवशी त्यांनी देह त्याग केला. अवघ्या तीन दिवसाच्या अंतराने माय-लेकाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक, मित्रपरिवार व पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Sangamner mother also died after the death of the child

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here