Home Accident News संगमनेर पुणे नाशिक महामार्गावर डंपरची दुधाच्या टेम्पोला धडक

संगमनेर पुणे नाशिक महामार्गावर डंपरची दुधाच्या टेम्पोला धडक

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर कर्जुले पठार येथील उड्डाणपुलावर मालवाहू डंपरने दुधाच्या टेम्पोला धडक दिल्याने भीषण अपघात घडला.

टेम्पोमधील दुधाच्या पिशव्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातप्रसंगी दोनही वाहने पलटी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुधाचा टेम्पो हा संगमनेरकडून पुणेकडे जात होता. हा टेम्पो महामार्गावर कर्जुले पठार येथील उड्डाण पुलावर आला असता मागून येणाऱ्या डंपरने टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली. यावेळी दोनही वाहने पलटी झाले. टेम्पो मधील असलेल्या दुधाच्या पिशव्या रस्त्यावर असताव्यस्त झाल्या. दुधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघाताची माहिती समजताच डोळसनणे महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या सुचनेवरून साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, योगीराज सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.

Web Title: Sangamner nasik pune highway milk tempo dumpar Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here