Home अहमदनगर घरात घुसून महिलेचा विनयभंग, आरोपीस अटक

घरात घुसून महिलेचा विनयभंग, आरोपीस अटक

Nevasa house and molesting a woman

नेवासा | Nevasa:  नेवासा तालुक्यातील सुकळी येथील एका विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात घुसून एका महिलेच्या हाताला धरून साडीचा पदर ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना २५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात एका २७ वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली असून सुनील दिलीप गुंड रा. सुकळी ता. नेवासा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरात काम करत असताना आरोपी सुनील गुंड याने अनधिकृतपणे फिर्यादीचा घरात घुसून तिच्या हाताला धरून साडीचा पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केला असता त्याला मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक किशोर काळे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Nevasa house and molesting a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here