Home अहमदनगर शिक्षकांना प्राधान्याने कोविड लस द्या: दराडे

शिक्षकांना प्राधान्याने कोविड लस द्या: दराडे

Ahmednagar Give covid vaccine to teachers 

अहमदनगर: करोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोविड लस देण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबसाहेब बोडखे यांनी दिली.

यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अप्पासाहेब शिंदे, सुनील दानवे, महेंद्र हिंगे, वैभव सांगळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात करोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत देखील शिक्षक विद्यादानाचे कार्य करीत आहे. त्यांना प्राधान्याने कोविड लस देण्याची गरज असल्याची भावना शिक्षक आमदार दराडे यांनी व्यक्त करून मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

तसेच राहता तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे कोविड लसीकरण प्राधान्यक्रमाने करण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षक संघ, रयत सेवक संघ, कला अध्यापक संघटना आदी संघटनांनी तहसीलदारांकडे केली आहे.  

Web Title: Ahmednagar Give covid vaccine to teachers 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here