Home संगमनेर संगमनेरात १२ वी च्या डमी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेरात १२ वी च्या डमी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेरात १२ वी च्या डमी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर: १२ वी परीक्षेला डमी विद्यार्थी म्हणून बसलेल्या एका विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संगमनेरातील सह्याद्री जुनिअर कॉलेज मध्ये घडली.

सौरभ साहेबराव फड असे डमी विद्यार्थ्याचे नाव आहे. सह्याद्री कॉलेज मध्ये १२ वी चा फिजिक्स विषयाचा पेपर होता. सौरभ याने गिरीश तान्हाजी नागरे याच्या रिसीटवर स्वतः चा फोटो लावून त्या रिसीटची झेरोक्स काढून त्याचा वापर करत परीक्षेला बसला होता. ही बाब परीक्षा नियंत्रकाच्या लक्षात आली असता त्यांनी अधिक तपासणी केली असता हे रिसीट व परीक्षेला बसलेला विद्यार्थी  दोन्ही बनावट असल्याचे त्यांना आढळून आले. या प्रकरणी सौरभ फड या विद्यार्थ्याविरोधात केंद्र संचालक सुधाकर यशवंत उगले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here