Home संगमनेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोळे या ठिकाणी शाळेतून बदलून गेलेले माजी शिक्षकांचा...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोळे या ठिकाणी शाळेतून बदलून गेलेले माजी शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोळे या ठिकाणी शाळेतून बदलून गेलेले माजी शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न झाला.

शाळेतून बदलून गेलेले माजी शिक्षक आर.पी. राहाणे, केशव घुगे,प्रवीण वाकचौरे,विष्णू गुंजाळ, प्राजक्ता शेळके या पाचही शिक्षकांचा शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला, व भावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांसह पालकांनी शिक्षकांना निरोप दिला.
सदर कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजयभाऊ फटांगरे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य मिलिंदभाऊ कानवडे,पंचायत समितीच्या सभापती सौ.निशाताई कोकणे, दत्ताभाऊ कोकणे, सरपंच माधवराव वाळे,उपसरपंच अजित खर्डे, माजी उपसरपंच किरण नवले व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत दादा वाळे,सोपानकाका वाळे व सर्व सदस्य,व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मिनानाथ वाळे,माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक खेमनर सर व त्यांचा सर्व स्टाफ यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जंगले मॅडम, अप्पा गडाख सर,सोनवणे मॅडम,दिवेकर मॅडम,खताळ मॅडम,प्रगती खर्डे मॅडम व प्रतिभा भालेराव मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले.

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here