Home संगमनेर संगमनेर: चक्क शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्या कोंडला पण

संगमनेर: चक्क शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्या कोंडला पण

Sangamner News Bibatya was trapped in a goat pen

संगमनेर | Sangamner: बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला जातो.मात्र बिबट्या मिळत नाही. गोठ्यात आलेल्या बिबट्याला हुसकावून लावत नुकसान टाळण्याचा शेतकऱ्यांचा भर असतो. मात्र बिबट्या पकडला जावा यासाठी शेळ्या असलेल्या गोठ्यातच कोंडले. वन विभागाने कोंडले पण तोपर्यंत त्याने गोठ्यातील आठ शेळ्या ठार केल्या होत्या.

संगमनेर तालुक्यातील पठारभागातील वनकुटे येथे ही घटना घडली. शेतकरी प्रकाश रेवजी हांडे वनकुटे गावाजवळ असलेल्या कळमजाई वस्ती येथे राहतात. हांडे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या शेळ्या एका खोलीत कोंडल्या होत्या. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या वस्तीवर बिबट्या आला. शेळ्या बांधून ठेवलेल्या खोलीत तो गेला. तेथे शेळ्यांवर हल्ला केल्यामुळे त्या ओरडू लागल्या. आवाज ऐकून हांडे झोपेतून जागे झाले. काय झाले पाहण्यासाठी ते घराच्या बाहेर आले. शेळ्या बांधलेल्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता, समोर बिबट्या दिसला. खोलीतील काही शेळ्या त्याने ठार केल्या होत्या. हांडे समोर आल्याचे पाहून बिबट्याने त्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र हांडे यांनी पटकन खोलीच्या बाहेर येत खोलीचा दरवाजा बंद केला. त्यामुळे बिबट्या शेळ्या असलेल्या खोलीतच अडकला गेला.

त्यानंतर हांडे यांनी ही माहिती सीताराम हांडे यांना व वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिली. वन विभागाकडून त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही केली जात आहे.

Web Title: Sangamner News Bibatya was trapped in a goat pen

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here