Home Suicide News Suicide: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide by strangulation of a young man

राहुरी | Suicide: राहुरी शहरातील एका १९ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. विनोद सर्जेराव मोरे वय १९ वर्ष असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

विनोद हा राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी तो घराबाहेर पडला. काही मित्रांना भेटला. पाच वाजता तो आपल्या घरी गेला. घरातील सर्वजण पुढच्या खोलीत असताना तो मागच्या घरात गेला आणि घारतील छताच्या लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास घेतला. नंतर त्याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याला मयत घोषित केले. विनोद याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असे कुटुंब आहे.

Web Title: Suicide by strangulation of a young man

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here