Home क्राईम Sangamner News: संगमनेरात तीन बोगस लॅब चालकांवर गुन्हे

Sangamner News: संगमनेरात तीन बोगस लॅब चालकांवर गुन्हे

Sangamner News Crimes against three bogus lab drivers

संगमनेर | Sangamner News: वैद्यकीय क्षेत्रात खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षण डीएमएलटी असताना व मान्यता नसूनही रुग्णांची रक्त तपासणी केली व लॅब टेक्निशियन म्हणून काम करून रिपोर्टवर सही करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन जणांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

घुलेवाडी येथील संजीवन हॉस्पिटल मधील नितीन द्रुपद माळी व नवीन नगर रोड येथील दिशा क्लिनिकल लॅब मधील विकास कडलग, सुद्धा नवले आदींवर कारवाई करण्यात आली आहे.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

निमोणचे वैद्यकीय अधिकारी दीपिका संतोष पालवे व डॉ. मच्छिंद्र गणपत साबळे यांच्या निदर्शनास या बोगस लॅब चालकांचे रिपोर्ट हाती लागले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शहर पोलिसांत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियान्मावे तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे अधिक तपास करीत आहेत. आरोग्याशी खेळू पाहणाऱ्या या बोगस लॅब चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Sangamner News Crimes against three bogus lab drivers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here