Home अहमदनगर Crime News: चोर समजून एका तरुणाला बेदम मारहाण

Crime News: चोर समजून एका तरुणाला बेदम मारहाण

 

Crime News young man was beaten to death by a thief

राहुरी: अनिल बारहाते हा तरुण दिनांक १० ऑगस्ट रोजी रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी उभा राहिला होता. यावेळी आरोपींनी चोर चोर असा आरडाओरडा करून त्याला लोखंडी गज व लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केले. अनिल बारहाते हा तरुण लोणी येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

अनिल दशरथ बारहाते वय ३० रा. कुरणवाडी ता. राहुरी हा तरुण दिनांक १० ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजेदरम्यान बारागाव नांदूर येथील मंडलिक आखाडा येथे रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्यासाठी थांबला होता. यावेळी आरोपी सुरेश भुसारी व पाराजी भुसारी या दोघा जणांनी चोर चोर असा आरडाओरडा केला. तसेच त्याला लोखंडी गज व लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याची प्रकृती चिंताजनक असून लोणी येथे उपचार सुरु आहेत.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

याबाबत त्याने पोलिसांना जबाब दिला आहे. याप्रकरणी सुरेश भुसारी व पाराजी भुसारी या दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय जाधव हे करीत आहे.

Web Title: Crime News young man was beaten to death by a thief

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here