Home क्राईम संगमनेर तालुक्यातील अज्ञात चोरट्यांनी कृषी सेवा केंद्र फोडले

संगमनेर तालुक्यातील अज्ञात चोरट्यांनी कृषी सेवा केंद्र फोडले

Sangamner News thieves broke into an agricultural service center

संगमनेर | Sangamner News: संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा फाट्यावरील कृषी पराशर या कृषी सेवा केंद्राचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी शेतीचे औषधे व रोख रकमेसह ७३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केल्याची घटना घडली आहे. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आली.  

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हिवरगाव फाटा येथे अक्षय सुनील पाचोरे रा. चंदनापुरी यांचे कृषी पराशर वेदाक्त शेती तंत्रज्ञान नावाचे कृषी सेवा केंद्र आहे. रविवारी पहाटे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दुकानातील ६२ हजार ३०० रुपयांची शेतीची औषधे आणि ३ हजार ४०० रुपये रोख रक्कम असा ७३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. याप्रकरणी दुकानाचे मालक अक्षय पाचोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बढे हे करीत आहे.

Web Title: Sangamner News thieves broke into an agricultural service center

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here