Home अहमदनगर मटन दुकानदारावर खुनी हल्ला, दुकान चालवयाचे असेल तर

मटन दुकानदारावर खुनी हल्ला, दुकान चालवयाचे असेल तर

Ahmednagar News Accused of kidnapping minor girl arrested

अहमदनगर | Crime News: मटणाचे दुकान चालू ठेवायचे असेल तर दर महिन्याला पाच हजार दे, नाहीतर दुकान चालू देणार नाही असे म्हणत सागर गायकवाड, त्याचा भाऊ आणि वडिल आणि चुलते यांनी निंबळक गावाच्या शिवारात निंबळक रोडवर साहिल शेखवर खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी साहिल शेख याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून यावरून सागर गायकवाड व अन्य दोघे यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

साहिल शेख याने फिर्यादीत म्हंटले आहे की, त्याचे निंबळक गावाच्या शिवारात हॉटेल सावलीजवळ अल्ताब मटण शॉप नावाचे दुकान आहे. त्या ठिकाणी मंगळवारी दुपारी चार वाजेच्या  सुमारास सागर गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही), त्याचा सख्खा भाऊ (नाव माहित नाही), सागरचे वडील (नाव माहित नाही) आणि सागरचे चुलते (नाव माहित नाही) हे आले. त्यांनी शेख याला 3 तीन किलो बोकडाचे मटण )मागितले. त्यानंतर शेख याने तीन किलो मटण तोडून दिले.

त्यानंतर आरोपींनी शेख याच्याकडे ५००० रुपयांची मागणी केली. तसेच ५ हजार रुपये न दिल्यास दुकान चालवून न देण्याचा इशारा दिला. त्याय शेख याने नकार दिल्याने आरोपीनी शेख याला कुर्‍हाडीने डोक्यावर, तोंडावर, हाताावर, छातीवर मारहाण केली. तसेच शेख याच्या चुलत भावाच्या गळाला सत्तूर लावला.

या मारहाणीत दोन दात पडले व ओठालाही जबर मार लागला आहे. तसेच हातालाही मुक्का मार लागला आहे. यानंतर फिर्यादीच्या चुलत भावाने साहिल यास रुगणालयात नेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक पाठक करत आहेत.

Web Title: Crime News Murder attack on mutton shopkeeper Ahmednagar News Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here