Home अहमदनगर अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस अटक

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस अटक

Ahmednagar News Accused of kidnapping minor girl arrested

पाथर्डी | Ahmednagar News: 4 वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणार्‍या आरोपीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने अटक केली आहे. भाऊसाहेब ऊर्फ मनोज देवराम हंडाळ (रा. हंडाळवाडी ता. पाथर्डी) असे अटकेतील  आरोपीचे नाव आहे. तसेच त्यांनी पिडीत अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले आहे.

तपासकामी त्यांना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मनोज हंडाळ याने एप्रिल 2017 मध्ये एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा गुन्हा तपासकामी एप्रिल 2018 मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार एस. बी. कांबळे करत होते.

पिडीत मुलगी व मनोज हंडाळ नगरमार्गे पुणे येथे जात असल्याची माहिती कांबळे यांना मिळाली होती. सहायक निरीक्षक सतिष गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांबळे, अर्चना काळे, मोनाली घुटे यांच्या पथकाने आरोपी हंडाळसह अल्पवयीन मुलीला पुणे बस स्थानकावर ताब्यात घेतले. हंडाळ याला अटक करण्यात आली असून अधिक तपास पाथर्डी पोलीस  करीत आहे.

Web Title: Ahmednagar News Accused of kidnapping minor girl arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here