Home संगमनेर संगमनेर: स्टेज काढण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी- ३७ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर: स्टेज काढण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी- ३७ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर: स्टेज काढण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी- ३७ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर: गणपती विसर्जनासाठी रस्ता मोकळा करून द्यावा या कारणावरून तालुक्यातील खांडगाव येथील वैदू वस्तीत दोन गटात तुफान हाणामारी झाली.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

या हाणामारीत लोखंडी गज, लाठ्या, काठ्या, दांडके यांचा वापर करण्यात आल्याने अनेक कार्यकर्ते जखमी झाले. हि घटना रविवारी सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी वरून ३७ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी कि, शहरालगत असणाऱ्या खांडगाव हद्दीतील वैदुवाडी येथे दोन गटांत रस्त्यावरून जुना वाद आहे. त्यातच रविवारी एका मंडळाने बसविलेल्या गणपतीचा स्टेज काढण्यावरून दोन गटांत प्रचंड वाद व त्यानंतर लोखंडी गज, दगड, लाकडी बॅट च्या सहायाने प्रचंड हाणामार्या झाल्या. यात फिर्यादी सागर भाऊसाहेब शिंदे व दुसरा फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी अशोक सावरगा शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर भाऊसाहेब शिंदे , राजू शिंदे, सावरग्या शिंदे, अशोक शिंदे यांच्यासह इतर २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप साहेबराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून रामचंद्र शिंदे, किरण शिंदे, विनोद शिंदे यांच्यासह इतर १० जणांवर मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.नी. धाद्वड व पवार करत आहेत.   


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here