संगमनेर: राहता: गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू
संगमनेर: राहता: गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू
गणपती विसर्जन करीत असताना दोन तरुणानाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर व राहता तालुक्यात घडली आहे.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
संगमनेर तालुक्यातील अमृतनगर येथे राहणारा नीरज चंदुलाल जाधव वय २७ हा आपल्या कुटुंबांबरोबर प्रवरा नदीवर घरगुती गणपती विसर्जनासाठी गेला होता. नदीत वाळूसाठी खोदलेल्या खड्यात पडून त्याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हि घटना घडली. सोमवारी सकाळपर्यंत त्याची शोध मोहीम सुरु होती. सुमारे अठरा तासांनी म्हणजेच सकाळी नऊ वाजता तरुणाचा मृत देह बाहेर काढण्यात आला. अवैध वाळू उपसा प्रवरा नदीपात्रात मोठ्या खड्यांमुळेच तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
राहता तालुक्यातील पिंपळस येथे घरगुती गणपती विसर्जनासाठी गेलेला तरुण सागर रमेश कदम याचा पाय घसरून तळ्यात पडला आहे. हि घटना पिंपळस शिवारात रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सागर कदम याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला मुलाने व महिलांनी आरडाओरडा केला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. तीन तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा