Home संगमनेर संगमनेर: विहिरीतील पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

संगमनेर: विहिरीतील पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Sangamner News Two brothers drowned in a well

संगमनेर | Sangamner News: संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर शिवारात दगड खाणीतील विहिरीत पाण्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.

समाधान जालिंदर भडांगे वय १२ व सुरेश जालिंदर भडांगे असे या मयत भावंडाची नावे आहेत.

कौठे कमळेश्वर ते निळवंडे रस्त्यानजीक खिंड शिवारात दगड खाण आहे. समाधान व सुरेश ही भावंडे शेळ्या पाणी पाजण्यासाठी खाणीकडे गेली होती. शेळी पाण्यात पडली म्हणून तिला वाचविण्यासाठी समाधान भडांगे पाण्यात उतरला आणि पाण्यात बुडाला. आपला भाऊ पाण्यात बुडाल्याचे पाहून सुरेश हा त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उतरला. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोबती असलेल्या काही मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्याने गावात घटनेची माहिती दिली.

पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांनी घटनास्थळी जाऊन खात्री करत संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Sangamner News Two brothers drowned in a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here