Home क्राईम संगमनेरात गुटका व पानमसाला साठा केल्याप्रकरणी एकास अटक 

संगमनेरात गुटका व पानमसाला साठा केल्याप्रकरणी एकास अटक 

Sangamner One arrested for stockpiling gutka and panmasala

संगमनेर | Sangamner: राज्यात गुटका बंदी आहे. ही बंदी असूनही एकाने गुटका व पान मसाल्याचा साठा केल्याने पोलिसांनी एकास अटक केली आहे.

संजय बाबूलाल लुकंड वय ४५ अभंग मळा संगमनेर असे या संशियीताचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून अवैध गुटका विक्री व साठा विरोधात मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांना लुकंड यांच्या राहत्या घराच्या शेजारी गोदामात गुटका व पानमसाला साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी शनिवारी दुपारी या गोदामावर छापा टाकत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला आढळून आला आहे.

संगमनेर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकण्याची मोहीम हाती घेतल्याने अवैध धंद्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

Web Title: Sangamner One arrested for stockpiling gutka and panmasala

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here