Home Accident News संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

Sangamner One killed in unidentified vehicle Accident news

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यात पिंपळे शिवारात लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर पिंपळे शिवारात चकोर वस्ती दरम्यान अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक ४५ वयाचा अज्ञात व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

संगमनेर तालुक्यातील लोणी ते नांदूशिंगोटे रस्त्यावर पिंपळे शिवारातील चकोर वस्तीजवळ अज्ञात वाहनाने अनोळखी व्यक्तीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  याप्रकरणी ज्ञानेश्वर एकनाथ चकोर ( वय 21 वर्ष रा. पिंपळे ) यांनी फिर्याद दिली असून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत. या अपघातात मृत्यू झालेली अनोळखी व्यक्ती कोण व कुठली याचा शोध घेण्याचे काम संगमनेर पोलीस करीत आहे.

Web Title: Sangamner One killed in unidentified vehicle Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here