Home क्राईम Rape: व्यक्तीने आपला घटस्फोट झाल्याचे सांगून एका २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार

Rape: व्यक्तीने आपला घटस्फोट झाल्याचे सांगून एका २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार

Pune Crime victim was taken to different places by showing the lure of marriage and forcibly rape

पुणे | Pune Crime: पुण्यात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका व्यक्तीने आपला घटस्फोट झाल्याचे सांगून एका २७ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे.  आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीच्या या काळ्या कृत्यात त्याच्या पत्नीचाही सहभाग होता. आरोपी पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार (sexual assualt) करत असताना, तिने दोघांचे अश्लील फोटो (Pornographic photos) काढले आहेत.

तर त्यांनी पीडित तरुणीचे न्यूड फोटो तिच्या पतीला पाठवून तिची बदनामी देखील केली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे,  विशाल गायकवाड (वय-४७) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो कोंढवा परिसरामधील पॅराडाईज व्हिला येथील राहणारा आहे. या प्करणी पोलिसांनी आरोपीच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल आणि पीडित तरुणीची सर्वप्रथम २०१८ साली ओळख झाली होती. पीडित तरुणीच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगत आरोपीने पीडितेशी जवळीक साधली होती. तसेच आपला घटस्फोट झाला असल्याचे खोटे सांगून पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले होते. तसेच माझी पत्नी केवळ पैशाकरिता माझ्याबरोबर राहत आहे,  अशी खोटी माहिती आरोपीने पीडितेला दिली. यानंतर आरोपीने २०१८ पासून २ फेब्रुवारी २०२२ पर्यंत टर्फ क्लब हाऊस, कॅम्प आणि पाषाण येथील आपल्या घरी पीडितेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

तसेच आरोपीच्या पत्नीने दोघांचे अश्लील फोटो आपल्या मोबाइलमध्ये क्लिक केले आहेत. तू माझ्याबरोबर राहिली नाहीस तर ‘तुला जीवे मारून टाकेन’ अशी धमकी देखील आरोपीने पीडितेला दिली होती. तर त्यांनी पीडित तरुणीच्या लग्नानंतर तिच्या पतीला दोघांचे अश्लील फोटो पाठवून बदनामी केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Pune Crime victim was taken to different places by showing the lure of marriage and forcibly rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here