Home महाराष्ट्र लता मंगेशकर निधनामुळे राज्य सरकारने दुखवटा, सार्वजनिक सुट्टी जाहीर

लता मंगेशकर निधनामुळे राज्य सरकारने दुखवटा, सार्वजनिक सुट्टी जाहीर

State government mourns Lata Mangeshkar's death

Lata Mangeshkar:  भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.  यामुळे देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे.

उद्या 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. लतादीदी यांच्या निधनामुळे केंद्र सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

त्यामुळे पुढचे दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

याबाबत राज्यसरकारने अधिसूचना काढली आहे.  “आज रविवार 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे.

या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( 1981 चा अधिनियम 26) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे”.

Web Title: State government mourns Lata Mangeshkar’s death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here