Home Accident News संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू

Sangamner One killed in unidentified vehicle Accident

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील बोटा ते ब्राम्हणवाडा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवार दिनांक १५ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.

या अपघातात नाथा लिंबा मेंगाळ वय ६० रा. कुरकुटवाडी ही व्यक्ती ठार झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी नाथा हे किराणा माल आणण्यासाठी बोटा येथे रात्री साडे आठ वाजता गेले असता काळाखडक वस्तीजवळ बोटा ते ब्राम्हणवाडा रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. ही माहिती समजताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून बोटा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले.

याप्रकरणी अंकुश मेंगाळ यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख करत आहे.

Web Title: Sangamner One killed in unidentified vehicle Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here