Home अहमदनगर Murder:  म्हणूनच केली ११ वर्षीय मुलाची अल्पवयीन मुलाने गळा चिरून हत्या   

Murder:  म्हणूनच केली ११ वर्षीय मुलाची अल्पवयीन मुलाने गळा चिरून हत्या   

11-year-old boy was murder by a minor

शेवगाव | Murder: आपण करत असलेल्या चोरीचे बिंग फुटू नये म्हणूनच एका अल्पवयीन मुलाने ११ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेवगाव तालुकातील खुंटेफळ येथे सोमवार १० मे रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

सार्थक अंबादास शेळके या मुलाची घरातच गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोधून काढले आहे. एका अल्पवयीन मुलाने ही हत्या केल्याचे उघडकीस झाले आहे. घरात कोणी नसल्याचे पाहून हा मुलगा चोरी करण्यास गेला असता तेवढ्यात सार्थक घरात आला असता आपली चोरी पकडली जाणार असे लक्षात आल्यावर त्या मुलाने ११ वर्षीय सार्थकची गळा चिरून हत्या केली. यापूर्वीही शेळके यांच्या घरातून चोरी केल्याचे उघड झाले आहे.  अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, सार्थकचे वडील अंबादास शेळके आपल्या कुटुंबासोबत घराबाहेर काम करत होते. सार्थक आणि त्याचा लहान भाऊ बरोबर होता. घरापासून काही अंतरावरच वाडग्यात नवीन घराचे काम सुरु होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास सर्थाकच्या वडिलांनी घरातून मोबाईल जाऊन आणण्यास सांगितले. सार्थक घरी गेला मात्र बराच वेळ झाला तरी तो परत आलाच नाही. म्हणून त्याच्या लहान्या भावास पाठविले तर सार्थक हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. मानेवर वार केलेला होता. सार्थकला वडिलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा खून कोणी व कशासाठी केला हे गूढ उकलले नव्हते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. गावातीलच एका अल्पवयीन मुलाने हत्या केल्याचे समोर आले आहे. आपले बिंग फुटू नये म्हणूनच सार्थकची हत्या केली असल्याची कबुली या मुलाने पोलिसांकडे दिली आहे.    

Web Title:11-year-old boy was murder by a minor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here