Home संगमनेर संगमनेर: कांदा रुपया किलो- संतप्त शेतकर्यांनी फेकला रस्त्यावर कांदा

संगमनेर: कांदा रुपया किलो- संतप्त शेतकर्यांनी फेकला रस्त्यावर कांदा

संगमनेर: कांदा रुपया किलो- संतप्त शेतकर्यांनी फेकला रस्त्यावर कांदा

संगमनेर: संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी लाल कांद्याला केवळ एक रुपया किलो (प्रती किंटल १०० रुपये) भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या काही शेतकर्यांनी सायंकाळी बाजार समिती गेट समोरील पुणे नाशिक महामार्गावर कांदा फेकून निषेध केला. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलीस आणि अग्निशमन दलाने नंतर रस्ता मोकळा केला.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

अकोले तालुक्यातील गणोरे येथील भाऊपाटील जयराम आंबरे, गणेश काशिनाथ आंबरे, मंगेश रामदास अंबरे व प्रवीण विलास आंबरे यांनी आपला कांदा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. त्यांच्या लाल कांद्याला शंभर रुपये प्रती किंटोल असा भाव मिळाला. यावेळी गोणी, गाडीभाडे , हमाली व तोलाईचा खर्च धरला असता कांद्याला १४० रुपये प्रती किंटोल इतका खर्च आला होता. बाजारात त्या कांद्याला १०० रुपये भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या आंबरे बंधूनी आपला माल रस्त्यात ओतून देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जवळपास २० ते २५ गोण्या रस्त्यावर फेकून देत आपला निषेध व्यक्त केला. मागील आठवड्यात याच कांद्याला ४०० ते ६०० रुपये प्रती किंटोल भाव मिळाला होता. टो अचानक कोसळल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला. सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असताना शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन केले. मात्र व्यापार्यांनी संघटीत पणे शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचे काम चालविले आहे. एक रुपया किलो कांद्याला भाव देऊन शेतकर्यांवर अन्याय चालविला आहे. मजुरी भाडे हे सुद्धा खिशातून देण्याची वेळ आल्याने शेतकर्यांनी हा कांदा रस्त्यातच फेकून दिला.  

Website Title: Sangamner onion price rate reverse 


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here