संगमनेर: अवैध वाळू वाहतूक पिकअपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
संगमनेर(Sangamner): संगमनेर शहरात जोर्वे नाका येथे वाळू वाहतूक पिकअपने एका युवकास जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातात अरफाद अल्ताप शेख रा. नाईकवाडापुरा या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी पहाटेच्या सुमारास जीर्वे नाका परिसरात घडला.
प्रवरा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करून पिकअप (एम.एच.१५.ए.जी.२४४०) या वाहनातून वाळू वाहतूक केली जात होती. जोर्वे नाका परिसरात भरधाव जाणाऱ्या या पिकअपची अरफाद शेख जोरदार धडक बसली असून या धडकेत हा तरुण जखमी झाला. त्याला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली.
या अपघातानंतर चालक पिकअप सोडून फरार झाला. ही पिकअप शहर पोलीस ठाण्याच्या आवारात उभी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक विजय खाडे करीत आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner pickup Accident youth Death