Home अकोले अकोलेत दोन तर संगमनेरात ३० करोनाबाधित एकाचा मृत्यू

अकोलेत दोन तर संगमनेरात ३० करोनाबाधित एकाचा मृत्यू

Sangamner Akole corona update today

संगमनेर(Sangamner): अकोले तालुक्यात आज आणखी दोन जणांची भर पडली आहे.धुमाळवाडी येथील सात वर्षीय मुलगा तर आदिवासी भागातील पेंडशेत येथील २७ वर्षीय महिलेचा करोना अहवाल शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्याची संख्या वाढून ६८ वर गेली आहे.

संगमनेर तालुक्यात तर करोनाने धुमाकुळच घातला आहे. आज बुधवारी तब्बल ३० रुग्ण आढळून आले आहेत. तर शहरातील  पदामानगर परिसरातील एकाचा  मृत्यू झाला आहे. 

आज प्राप्त अहवालात संगमनेर शहरात १० तर ग्रामीण भागात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. शहरात नवीन नगर रोड येथील ५० व ३० वर्षीय पुरुष,  घास बाजार येथील ५७ व ५५ वर्षीय पुरुष, ५७ व २५ वर्षीय महिला, बाजारपेठ येथील ६५ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिला, मोगलपुरा येथे ७१ वर्षीय पुरुष, भारतनगर येथे ५४ वर्षीय महिला असे दहा रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुक्यातील कुरण येथील ३७ वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील ४० वर्षीय महिला, पेमगिरी येथे ३० वर्षीय व्यक्ती, राजापूर येथे ६० वर्षीय पुरुष, घुलेवाडी १६ वर्षीय मुलगा, रायते येथील ५४ वर्षीय पुरुष,निमगाव जाळी येथील ६५ वर्षीय महिला,, शिबलापूर येथील ६५ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, पिंपळगाव देपा येथील २२ वर्षीय तरुणी, ३ वर्षीय बालिका, नांदुरी दुमाला येथे ४४,१६,३८ वर्षीय पुरुष, ३८,६५,४५,२३,२० वर्षीय महिला असे २० रुग्ण आढळून आले आहेत.   

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner Akole corona update today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here