Home अकोले शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाही तो पर्यंत कॅनाॅलचे काम बंद ठेवा: आ. डाॅ.किरण...

शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाही तो पर्यंत कॅनाॅलचे काम बंद ठेवा: आ. डाॅ.किरण लहामटे

Akole Nilwande Canal Work Stopped

अकोले प्रतिनिधी(Akole): दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी आपले प्रश्न सुटेपर्यंत म्हाळादेवी येथील कालव्याचे काम बंद पडून लोकप्रतिनिधी यांना कळविल्यानन्तर  आज  मंगळवार सकाळी ११वाजता निळवंडे कालवा खोदाई काम आमदार व राष्ट्रवादी,काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांच्या व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बंद करण्यात आले

दोन दिवसांपूर्वी  आमदार डाॅ.किरण लहामटे यांनी निळवंडे कॅनाॅल संदर्भात अनेक शेतकरी वर्गाच्या तक्रारी कानावर आल्यानंतर या तक्रारींचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असल्याने या संदर्भात आज प्रत्यक्ष जाऊन  तक्रारी निवारण करण्यासाठी  म्हाळादेवी येथील चालु असलेल्या कॅनाॅलच्या कामावर भेट दिली. यामध्ये सामान्य शेतकरी वर्गाच्या या कॅनाॅल खोदण्याचे काम चालु असताना अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन या तुटत असुन या संदर्भात सदर विभागाने तुटलेल्या पाईपलाईन जोडुन द्याव्यात, तसेच विविध प्रश्नांसंदर्भात आज चर्चा झाली.

जो पर्यंत शेतकरी वर्गाच्या पाईपलाईन जोडल्या जात नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तसेच पुन्हा या लाॅकडाऊनच्या कालावधीत जलसंपदा मंञी जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली तेव्हा या विषयावर चर्चा झाली होती माञ खात्यातील अधिकारी, कर्मचारी हे शेतकरी वर्गाची किरकोळ अडचणी ऎकुन घेत नाही.यामुळे आज जलसंपदा मंञी जयंत पाटिल व महसुल मंञी बाळासाहेब थोरात  यांच्याशी चर्चा करुन लवकरच हा प्रश्न निकाली काढला जाईल.असे आश्वासन आमदार किरण लहामटे यांनी दिले आहे.

त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की सदर जमीनी या १९८३साली संपादित झाल्या व डिझाईन झाले माञ कालानुरूप डिझाईन मध्ये बदल होणे आवश्यक होते माञ असा बदल झाला नाही तसेच अनेक ठिकाणी रस्ते होणे आवश्यक होते माञ अनेक शेतकरी रस्ते नसल्यामुळे त्यांना आपली शेती करता येत नाही.निळवंडे कालव्याच्या दृष्टीने म्हाळादेवी व तालुक्यातील जे छोटे मोठे पूल असतील,रोड क्रॉसिंग असतील ती कामे प्राधान्याने करावी नंतरच कालव्याचे काम पूर्ण करावीत अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. तो पर्यंत कालव्याचे काम बंद ठेवावेत.

तसेच म्हाळादेवी जलसेतूचे काम तातडीने पूर्ण करावेत. शेतकरी वर्गाच्या किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी ऎकुन न घेता अधिकारी मनमानी करत आहेत.माञ हे महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी हिताचे सरकार असुन शेतकरी वर्गाला कोणताही ञास होणार नाही यासाठी बांधील असणार आहे.लवकरच गुरुवारी ११.००वाजता प्रांत अधिकारी, तहसीलदार, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बैठक करुन तोडगा काढण्यात येईल तोपर्यंत कॅनाॅलचे काम बंद ठेवण्यात येईल.

यावेळी शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी तसेच राष्ट्रवादी  जेष्ठ नेते अशोकराव भांगरे,अकोले राष्ट्रवादी  तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे,युवक राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष रविंद्र मालुंजकर,जेष्ठ कार्यकर्ते मिनानाथ पांडे,राजेंद्र कुमकर, शिवसेनेचे म्हाळादेवी गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रदिप हासे,पाटीलबुवा सावंत,भाऊसाहेब मोरे,विकासराव बंगाळ,विनोद हांडे उपस्थित होते.  

महाअघाडीचे सरकार सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारानी व शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी कालव्याचे काम बंद पाडल्याने  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  काय भूमिका घेतात याकडे लक्ष्य लागून आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole Nilwande Canal Work Stopped

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here